जून महिना संपत आला, पण अजून काही पावसाचे आगमन महाराष्ट्रात झालेले नाही.
हवामान खात्याचा तर अंदाज सतत चुकत आहे. काही दिवसांपूर्वी अरबी समुद्रात बिपोरजॉय चक्रीवादळ होऊन गेले. त्यामुळे पाऊस आणखी काही दिवस पुढे गेला. आता महाराष्ट्रात पावसाची केवळ शेतकरीच नाही तर राज्याचे मंत्री सुद्धा वाट पाहत आहेत. याचे कारण म्हणजे महाराष्ट्रातील धरणांमध्ये पाणीसाठा अपुरा आहे.
महाराष्ट्राची राजधानी मुंबईत केवळ १५ दिवस पुरेल एवढाच पाणीसाठा आहे. मुंबईच नव्हे तर महाराष्ट्रातील प्रमुख शहरांमध्येही पाणीसाठा कमी आहे. रोज येणारे पाणी एक दिवसआड येत आहे. जर पावसाचे लवकर आगमन नाही झाले तर शहरातील लोकांना प्यायलासुद्धा पाणी मिळणार नाही. यावर्षीचा उन्हाळा फार कडक होता. त्यामुळे धरणातील पाण्याचे बाष्पीभवन जास्त झाले.
शेतकरी दरवर्षी पावसाची वाट पाहत असतो. कारण त्याची शेती पावसावर अवलंबून असते. पण यावेळी पावसाचे आगमन खूप वेळाने होत आहे. त्यामुळे शेतकऱ्यांची शेतीसुद्धा लांबणीवर पडली आहे. महाराष्ट्रातील कोकण (सिंधुदुर्ग जिल्हा) भागात पावसाचे आगमन झाले आहे. पण तो पाऊस पुढे सरकणेही महत्त्वाचे आहे.
0 Comments