भारत माझा देश आहे

म्हणायला आनंद जरी वाटे आज

माझेच भले कसे होई 

भारतात लोकांच्या अश्या विचारांची वाटे लाज| 



                                                                        _ मेश्राम तेजस्विनी kondhali ,nagpur


जेव्हा विविधते मध्ये म्हटले जाते एकता |

जेव्हा येता वाईट प्रसंग

तेव्हा का माणूस पडतो एकटा?


जेव्हा आजही म्हणतात भाईचारा नी बंधुभावाने राहतो तूम्ही आम्ही

तेव्हा आजही जतींवरून राजकारण का करे तुम्ही आम्ही?

नोकरी साठी भरकटलेल्या माणसा- माणसात जात पात पाहून करे भेद - भेद 

तेव्हा आज हि करे मतभेद|


मंदिर, मशिदीत, गुरुद्वारात जाऊन, देव देव करी

माणूस माणसाशी आज कुठे माणुसकीने वागी?

आपल्या स्वार्थसाठी मग निंचपणाचा कळस गाठी|


जेव्हा लहान आस्ता  शिवबा

पद्या मागून डोकावून बघी सरदार काय बघतोय तर बायकांचा नाचं

तेव्हा  नझरेत येता आई जिजाऊ म्हणी ... शिवबा नाच बघणारा नको 

राखणारा पाहिजे लाज


जेव्हा म्हटले जाते भारत शांतताप्रिय देश

तेव्हा काढतात सिनेमावर खोट

उचलतात अशांततेचा,

 द केरला स्टोरी वर बोट


जिथे सांगितल्या जाते  डॉ.आंबेडकरांच्या संविधानात भारत हा धर्मनिरपेक्ष देश 

अन्यायाला मात देऊन कलम कायद्याने मिळावे न्याय

श्रद्धाचे 36 तुकडे करून केली मारहाण 

तिला मिळावा लवकरात लवकर न्याय


म्हटले जाते भारतात

ताजमहाल हे एक महान स्मारक नी  प्रेमाचे प्रतीक

श्राद्धाचे 36 तुकडे नी 16वर्षीय मुली वर केले जाते चाकूने वार छातीत

अत्याचाराने गाठलेला पार 

कळस

पाहून डोळ्याने अत्याचार,हिंसा,मारहाण

मला काय करायचे म्हणता सारे आज



विविध धर्माची लोक त्यांची संस्कृती,परंपरा,सण एकत्र पाळतात

जिथे सर्व धर्माचे लोक बंधुभावाने

राहतात

त्याच धर्तीवर प्रेमाचे जाळे टाकून कारे मुलींवर करता अत्याचार?



घडवायला आपला भारत महान

हवी जिद्द नी करण्याची तहान

बंधू.भगिनींना साथ देऊन 

जिथे शिवबांचे विचार परत एकदा मनात रुजवून

तो ह्रदयात असतो,असा परत पाहायला मिळणार भारत  

जिथे जिजाऊ,सावित्री अहिल्या,

यांच्या सारखे परत एकदा स्वतः चे अस्तित्व निर्माण करता येई


येऊ सारे एकत्र करू संकटावर मात 

आज अश्या एका हातात मोबाईल असता. 

देऊ एका दुसऱ्या हातात हिम्मतीचा दुसऱ्या हात

ज्यातून रक्षण करे स्वतच्या स्वतः

   _ मेश्राम तेजस्विनी kondhali ,nagpur