क्रांतिकारी जय भीम


संघटित नसलेल्या झोपलेल्या षडांनो आता तरी उठा जागे व्हा...

कालची घटना नांदेड येथील घटना अक्षय भालेराव याने गावात पहिल्यांदाच आपल्या उधारकर्त्या बापाची जयंती साजरी केली तर काही मराठा समाजाच्या जातीचा माज चढलेल्या धनदांडग्या जातदांडग्या लोकांना ते खटकल त्यांनी डाव रचला आणि त्यांचा राग काल अनावर झाला आणि या भडव्यांनी काल अक्षय भालेराव या तरुणाला जनावर कापल्यागत जीवे मारल्या गेल..



कुठे आहे या देशातील सामाजिक न्याय व्यवस्था,समता,समानता बंधुता..अरे आधी सुद्धा या गावात बुद्ध विहारावर हल्ले झालेत..वर्षाकाठी दोन चार ऍट्रॅसिटी केसेस होतात अशी माहिती आहे...आमचा गुन्हा काय..? 

जातीयवाद संपला म्हणून मुळाच्या देठापासून ओरडणाऱ्यांनो आता बोबंलणार नाहीत का की जातीयवाद संपला म्हणून..

जातीयवादि वृत्तीचा माज  चढलेल्या मस्तावलेल्या या डुकर माणुसकीचे भान विसरलेले आहेत..यांचं कुणीच काही वाकड करू शकत नाही...त्याचाच फायदा घेत काही जातीयवादी वृत्तीचे बांडगुळ कुठे खैरलांजी घडवतात तर कुठे जवखेडा,उना,सहारणपुर,खर्डा,भीमा कोंरेगाव दंगल,रिंग टोन वाजवली म्हणून,हत्याकांड,इतर जातीच्या मुलीसोबत लग्न केल म्हनुन हत्याकांड,अरविंद बन्सोड हत्याकांड,हे हत्याकांड सहन करत करत भीम अनुयायांची तारांबळ उडते एकच उद्रेक होतो संपूर्ण देशात प्रतीकात्मक प्रतिक्रिया उमटते,निषेध होतो मोर्चे निघतात मात्र या  न्यायव्यवस्थेमध्ये आपल्याला न्याय मिळत नाही..आमचा गुन्हा काय तर आम्ही आंबेडकरवादि आहोत..?


म्हणजे जातीयवादी भडवे वाटेल ते अन्याय हत्याचार करतील आम्ही मात्र निषेध करून  शांत बसायच का..?


कालच्या घटनेची कुठेही बातमी नाही कुठेच वाछता नाही मीडियाने यावर भ्र सुद्धा काढला नाही,सगळे मूग गिळून चूप बसलेले आहे जणू काही घडलच नाही..


आणि आपण संघटित नाही कुठल नेतृत्व स्वीकारत नाही गाव शहर तिथे सामाजिक संघटन नाही..का आपण एवढे षंढ झालोत कुठे गेला तो भीमा कोरेगाव चा आपला बाणा, कुठे गेला तो भीम चळवळीचा धगधगता कार्यकर्ता कुठे ठेवल्या त्या चळवळीच्या मशाली,कुठे गेली आपल्यातील संवेदनशीलता,अक्षय भालेराव याने  स्वतःसाठी तर 14 एप्रिल केली नसेल नक्कीच डॉ बाबासाहेब आंबेडकरांची जयंती आपल्या गावात सुद्धा साजरी व्हावी आपल्या गावातही आपल्या उद्धारकर्त्या बापाच्या जयंतीचा जल्लोश व्हावा म्हणून अक्षय भालेरावने समोर येऊन पुढाकार घेतला तर समाजाच वलय निर्माण व्हाव आपल अस्तित्व टिकुन रहाव,हाच त्याचा उद्देश असावा समाजासाठी लढण्याची अक्षय ला इतकी मोठी शिक्षा..आणि आपण गप्पगार बसलेलो आहोत...


न्यायव्यस्था त्यांच्याच  हातात,सत्ता ही त्यांच्याच  हातात,पोलीस प्रशासन त्यांच्याच हातात,वकील ही त्यांचेच आणि जज ही त्यांचेच आपल्याला न्याय मिळेल कसा..

आपण तर नेतृत्वहीन होऊन जगत आहोत ना..आपल ना सामाजिक संघटन आहे, ना आपल राजकीय वलय आहे,त्यामुळ ही विदारक परिस्थिती आहे..


आपण संविधानिक रित्या प्रात्येक गोष्टीचा निषेध व्यक्त करतो त्याचाच फायदा घेऊन हे सत्ताधारी आणि काही जातीयवादी भडवर नेहमी आम्हाला वेठीस धरतात..

पण या व्यवस्थेला उरून पूरु इतकी ताखद आमच्यात आहे,पण आम्हाला न्याय संविधानिक मार्गाने पाहिजे...


जागे व्हा आपल्याला अक्षय ला न्याय मिळवून घ्यायचा आहे आणि येथून पुढे कुठलाही अक्षय जातीयवादी वृत्तीला बळी पडणार नाही हे उराशी गाठ बांधायला हवी या देशातील जातीयवादी धर्मांध व्यवस्था ही आपल्या समाजाच्या जिवावर उठली आहे..आपल्याला निर्दोष लोकांचा नाहक बळी जाऊ द्यायचा नाही.या घटनेचा प्रत्येक स्तरावर विरोध झाल्यापाहीजे जेणेकरून याजातीयवाद्यांना  जाग येईल...


या व्यवस्थेला आपल्यातील दलाल भडवे नेते जबाबदार आहेत जे स्वतःच्या स्वार्थापोटी नेहमी समाजाला विकण्याच काम करतात आणि आपल्या पोळ्या शेकतात,आणि आपल्यातले काही बैलबुद्धि त्या विकलेल्या नेत्यामागे लाळ चाटत फिरतात..


क्रांतिकारी जय भीम।