IAS अशोक खेमका...

मात्र तुम्हाला माहित नसेल. तुकाराम मुंढेंपेक्षाही सर्वाधिक बदले झालेले अधिकारी हरियाणामध्ये आहेत. हरियाणामध्ये IAS अशोक खेमका (Ashok Khemka) चर्चेत असणारे सनदी अधिकारी आहेत. ते सध्या मुख्य सचिव म्हणून अभिलेखागार विभागात काम पाहतात. महाराष्ट्रातील तुकाराम मुंडेप्रमाणे अशोक खेमका हे देखील आपल्या कडक शिस्तीसाठी ओळखले जातात. त्यांच्याही सततच्या बदल्यांमुळे ते चर्चेत येत असतात. गेल्या 30 वर्षात अशोक खेमका यांची ही 55 वेळा बदली जाली आहे. त्यांची अखेरची बदली जानेवारी 2023 मध्ये झाली होती.


कोण आहेत अशोक खेमका...

अशोक खेमका (Ashok Khemka) हे सनदी अधिकारी आहेत. ते 1991 च्या बॅचचे भारतीय प्रशासकीय सेवेचे अधिकारी आहेत. बदल्यांसाठी ओळखले जाणारे अशोक खेमका हे निवृत्त आयएएस अधिकारी प्रदीप कासनी यांच्यानंतर हरियाणातील दुसरे सर्वाधिक बदली झालेले अधिकारी आहेत.

2012 साली हरियाणामध्ये हुड्डा सरकार असताना सोनिया गांधी (Soniya Gandhi) यांचे जावई रॉबर्ट वॉड्रा आणि रिअल इस्टेट क्षेत्रातील दिग्गज डीएलएफच्या दरम्यान झालेल्या जमीन व्यवहाराचा करार त्यांनी रद्द केला होता. तेव्हापासून खेमका यांची देशभरात चर्चा झाली. त्यावेळी केंद्रात युपीएचे सरकार आणि हरियाणात देखील काँग्रेच सरकार होते.

Most Transferred IAS Officer: तुकाराम मुंढेंपेक्षाही सर्वाधिक बदले झालेले अधिकारी हरियाणामध्ये आहेत.

 


Maharashtra IAS Transfer News : महाराष्ट्रातील धडाकेबाज प्रशासकीय अधिकारी अशी ओळख असणाऱ्या तुकाराम मुंढे यांची पुन्हा एकदा बदली करण्यात आली आहे. मुंबईत मंत्रालयातील मराठी भाषा विभागाचे सचिव म्हणून त्यांची नियुक्ती करण्यात आली आहे. याशिवाय सुधाकर शिंदे यांना मुंबईचे अतिरिक्त महापालिका आयुक्त म्हणून कार्यभार सोपवण्यात आला आहे. डॅशिंग अधिकारी तुकाराम मुंढे....

तुकाराम मुंढे ( IAS Tukaram Munde) हे डॅशिंग प्रशासकीय अधिकारी म्हणून ओळखले जातात. अत्यंत शिस्तप्रिय आणि कायद्याने वागणारे प्रशासकीय अधिकारी म्हणून त्यांची खास ओळख आहे. तुकाराम मुंडे सनदी अधिकारी झाल्यापासून एका पदावर जास्त काळ राहिले नाहीत. त्यांच्या प्रशासकीय सेवेच्या १८ वर्षांच्या कार्यकाळात तब्बल २१ वेळा बदल्या झाल्या आहेत. त्यामुळेच सर्वाधिक वेळा बदली झालेले अधिकारी अशी त्यांची खास ओळख आहे.

लेखातून समजले असेल. अशी मी आशा करतो. ही माहिती तुमच्यासाठी महत्वपूर्ण ठरलि अशेल असे मला वाटते. तुमच्या मित्रांना नक्की शेअर करा. तुम्हाला हा लेख कसा वाटला ते कॉमेंट्स करून नक्की सांगा.  वाचण्यासाठी IFU  वेबसाईट शी जोडून रहा.